कल्याण – डोंबिवली दि. 10 जून :
राज्यातील सत्तेमध्ये आम्ही सर्व एकत्र असून केडीएमसी निवडणुकीतही आघाडी होण्याबाबत वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र आघाडी न झाल्यास केडीएमसी निवडणूक स्वबळावर लढवण्याचा पुनरुच्चार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ओबीसी आरक्षणबाबत न्यायालय जो काही निर्णय देईल तो देईल. परंतु न्यायालयाने हे आरक्षण नामंजूर केले तरी आगामी केडीएमसी निवडणुकीत 27 टक्के ओबीसी उमेदवारांना संधी देण्याची पक्षाची भूमिका असल्याचेही जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
तर आगामी केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या दारी हा हा उपक्रम राबवणार आहे. याच्या माध्यमातून कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सुविधांबाबत जागृत जागृत केले जाणार आहे. त्यासोबतच त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून 16जुन पर्यंत विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.