कल्याण दि.१४ जून :
आज १४ जून रोजी असणाऱ्या जागतिक रक्तदान दिनानिमित्त कल्याणात रक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण पश्चिमेतील नामांकित जी प्लस हार्ट हॉस्पिटलच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविला जाणार आहे.
आज असलेल्या जागतिक रक्तदान शिबिराच्या निमित्ताने १४ जून ते २१ जूनपर्यंत हा सप्ताह असणार आहे. या उप्रकमात अधिकाधिक रक्तदात्यानी सहभागी होण्याचे आवाहन जी प्लस हार्ट हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.
जी प्लस हार्ट हॉस्पिटल,
राधा नगरच्या समोर, केंब्रिया शाळेजवळ, खडकपाडा, कल्याण – प
वेळ : सकाळी १० ते संध्याकाळी ६