Home ठळक बातम्या डोंबिवलीतील आजच्या आंदोलनामागे दुर्योधनाची दृष्टी असणारे विरोधक – एकनाथ शिंदे गटाचा हल्लाबोल

डोंबिवलीतील आजच्या आंदोलनामागे दुर्योधनाची दृष्टी असणारे विरोधक – एकनाथ शिंदे गटाचा हल्लाबोल

 

डोंबिवली दि. २० ऑक्टोबर :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आज कल्याण डोंबिवलीमध्ये विविध प्रकारची विकासकामे सुरू आहेत. मात्र त्यांनतरही विघ्नसंतोषी आणि दुर्योधनाची दृष्टी असल्यामुळे विरोधकांना ती दिसत नसल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. डोंबिवलीमध्ये आज होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे सुरू आहेत. या भागाची भविष्याची गरज ओळखून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाऊले टाकायला सुरुवात केली आहे. त्यांच्याकडून या भागात इतक्या मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत की त्यामुळे विरोधकांना सोशल मिडियाद्वारे टिका करण्याशिवाय आता कोणतेही काम उरलेले नसल्याचा टोला यावेळी माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांनी लगावला.

तर आजच्या आंदोलनाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की विकासाची दृष्टी नसलेल्या काही विघ्नसंतोषी लोकांनी हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. चांगल्या सणाच्या दिवशी डोंबिवलीला बदनाम करण्याचे कामही या विघ्नसंतोषी लोकांकडून केला जात असल्याचा घणाघातही म्हात्रे यांनी यावेळी केला.

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जी विकासाची घोडदौड सुरू आहे ती आता थांबणार नाहीये. त्यामुळे विनाकारण डोंबिवलीचे नाव बदनाम होऊ नये यासाठी नागरिकांनी या आंदोलनात सहभागी न होण्याचे आवाहनही शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले.

यावेळी माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, शहरप्रमुख राजेश मोरे, राजेश कदम, महेश पाटील यांच्यासह शिंदे गटाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा