कल्याण-डोंबिवली दि.30 एप्रिल :
महाराष्ट्र शासनाच्या स्टेट फॅमिली वेल्फेअर ब्युरोकडून मिळालेल्या सूचनांनुसार आणि राज्य शासनाकडून उपलब्ध होणा-या लसीच्या पुरवठ्यामधून 1 मे म्हणजेच उद्यापासून 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानूसार ‘कोविन पोर्टलवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करुन स्लॉट बुक केलेल्या 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचेच उद्या 1 मे रोजी लसीकरण केले जाणार असून कल्याण पश्चिमेच्या लालचौकी येथील आर्ट गॅलरी केंद्रावर दुपारी 12.00 ते संध्याकाळी 5.00 या वेळेत हे लसीकरण होणार असल्याची माहिती केडीएमसी प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
तर 44 वर्षे आणि त्यापुढील नागरिकांचे लसीकरण केंद्र शासनाकडून लसीचा साठा उपलब्ध झाल्यानंतर पालिकेच्या सर्व केंद्रांवर लसीकरण केले जाईल अशी माहितीही कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे देण्यात आली आहे.
I hve 30 years.. i hve vaccine im 1st dose