Home ठळक बातम्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला तिरंग्याच्या रोषणाईत उजळून निघाले कल्याण

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला तिरंग्याच्या रोषणाईत उजळून निघाले कल्याण

 

कल्याण दि.25 जानेवारी :
स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने नागरिकांसाठी आगळे वेगळे गिफ्ट दिले आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून त्याच्या पूर्वसंध्येला कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौक ते प्रेम ऑटोपर्यंतचा मार्ग तिरंग्याच्या रोषणाईने उजळून निघाला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासन सध्या कल्याण डोंबिवली शहरात कायापालट अभियान राबवत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी आकर्षक चित्रे काढण्यासह आकर्षक विद्युत रोषणाईही केली जात आहे. तर याच अभियानाचा एक भाग म्हणून कल्याण पश्चिमेतील 120 स्ट्रीट लाईटवर तिरंग्याच्या थीमवर आधारीत आकर्षक अशी एलईडी रोषणाई करण्यात आली असून त्यामुळे शहराचे सौंदर्य अधिकच खुलून निघत आहे. तर येत्या काळात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ओक टॉवर, पत्रीपूलसारख्या महत्वाच्या ठिकाणी रोषणाई केली जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागरिकांमध्ये एक चांगला संदेश देण्यासाठी ही रोषणाई केल्याचेही केडीएमसी आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.

यावेळी महापालिका सचिव संजय जाधव, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा