महिला जिल्हा संघटक विजया पोटे यांच्या वतीने रोजगार मेळावा
कल्याण दि. 24 जानेवारी :
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना कल्याण जिल्हा महिला संघटक विजया पोटे यांच्यावतीने आयोजित रोजगार मेळाव्यात अनेक बेरोजगारांना रोजगार मिळाला. शिवसेना बेतूरकर पाडा विभाग – प्रभाग क्रमांक २२,२३ आणि २७ च्या वतीने कल्याण पश्चिमेत येथे या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोना काळात अनेक तरूण-तरुणींच्या नोकऱ्या गेल्या. अशा परिस्थितीत शिवसेनाप्रमुखांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रानुसार बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त हा रोजगार मेळाव आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये २० पेक्षा अधिक कपन्यांनी सहभाग घेत 1 हजारहून अधिक तरुण तरुणींनी नोंदणी केली. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
आजचा हा दिवस शिवसैनिकांसाठी स्फूर्तीचा दिवस असून बाळासाहेबांनी संपूर्ण जगात हिंदुत्त्वाच्या जागर केला. सध्या नोकऱ्यांचा विषय गहन असून कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने आयोजित हा रोजगार मेळावा खूप मोठा आधार ठरेल असे मत आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केले.
यावेळी आमदार विश्वनाथ भोईर, महिला जिल्हा संघटक विजया पोटे, नगरसेविका प्रियंका भोईर, छाया वाघमारे, नगरसेवक जयवंत भोईर, माजी नगरसेवक अरविंद पोटे, सुनील वायले, विद्याधर भोईर, जयवंत भोईर, शाखा प्रमुख संतोष भोईर आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.