कल्याण डोंबिवली दि.5 जून :
उद्याला म्हणजेच गुरुवारी 6 जून 2024 रोजी कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा 10 तास बंद राहणार आहे. पाणी गळती थांबवण्यासह बारावे आणि नेतिवली जलशुध्दीकरण केंद्रात देखभाल दुरूस्तीची कामे करण्यासाठी हा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे. (No water in Kalyan Dombivli tomorrow (June 6, 2024); Closed for maintenance)
उद्या सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असा दहा तास कल्याण डोंबिवलीतील कल्याण पूर्व – पश्चिम आणि डोंबिवली पूर्व-पश्चिमेचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.