
पुणे दि.16 नोव्हेंबर :
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाळांच्या सुट्टीबाबत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून एक प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले आहे. त्याद्वारे 18 आणि 19 नोव्हेंबरला कोणतीही सुट्टी जाहीर करण्यात आली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शिक्षण विभागाचे असे आहे हे प्रसिध्दी पत्रक…
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये क्षेत्रिय स्तरावर दिनांक १८/११/२०२४ व दिनांक १९/११/२०२४ रोजी सुट्टी जाहीर करण्याबाबत काही संभ्रम निर्माण झाल्याचे दिसते.
२/- शासनाच्या संदर्भ क्रमांक १ मधील पत्रान्वये दिलेल्या सूचना अत्यंत स्पष्ट आहेत. याबाबतीत असे कळविण्यात येते की, दिनांक १८/११/२०२४ व दिनांक: १९/११/२०२४ रोजी शाळा सुरु राहतील. तसेच उक्त दिवशी कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही.
३/- केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक शाळेत उपलब्ध असणार नाही अशा शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापतक यांनी त्यांचे अधिकारात सुट्टी जाहीर करावी आणि अशा शाळा वगळता उर्वरित सर्व शाळा नियमितपणे सुरु राहतील.
४/- केवळ उपरोक्त परिस्थितीतील विशिष्ट शाळांना स्थानिक पातळीवर मुख्याध्यापक यांनी सुट्टी जाहीर करावी. तसेच ही सरसकट व सार्वजनिक सुट्टी नाही याची नोंद घ्यावी. तसेच कोणत्याही शाळा अनावश्यकरित्या बंद राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी.