Home Uncategorised शिवसेना कल्याण पूर्व शहरप्रमुखपदी निलेश शिंदे तर विधानसभा प्रमुखपदी प्रशांत काळे यांची...

शिवसेना कल्याण पूर्व शहरप्रमुखपदी निलेश शिंदे तर विधानसभा प्रमुखपदी प्रशांत काळे यांची नियुक्ती

जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी जाहीर केल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

कल्याण दि.14 नोव्हेंबर :
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून आज विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये कल्याण पूर्व शहर प्रमुखपदी निलेश शिंदे यांची तर विधानसभा प्रमुखपदी प्रशांत काळे यांची नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्याकडून निवडणूक मध्यवर्ती कार्यालयात या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली.

महायुतीच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या महेश गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी निलंबनाची कारवाई झाल्याने शिवसेना कल्याण पूर्व शहरप्रमुख पद रिक्त होते. सध्या विधानसभा निवडणुक अंतिम टप्प्यात आली असून या पार्श्वभुमीवर हे पद रिक्त ठेवणे उचित ठरले नसते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून सर्व प्रमुख पदांवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

ज्यामध्ये शहरप्रमुख पदी म्हणून निलेश शिंदे, विधानसभा प्रमुखपदी प्रशांत काळे, उप शहर प्रमुखपदी कृष्णा साळुंखे, उपविभाग प्रमुख पदी राजाराम आव्हाड आणि उप शाखाप्रमुख पदी संतोष गवारे यांची नावे घोषित करण्यासह या सर्वांना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

तसेच डोंबिवलीत मुख्यमंत्री यांच्या सभेमध्ये उद्धव शिवसेनेत प्रवेश केलेल्या हर्षवर्धन पालांडे, कामेश जाधव, सत्यवान खेडेकर, महेंद्र एटमे, अनंत आंब्रे यांचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

विविध पदांवर नियुक्ती करण्यात आलेले हे सर्व पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना अपेक्षित असे सर्वांना एकत्र घेऊन पक्षाचे काम करतील असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी उपजिल्हाप्रमुख मल्लेश शेट्टी, अरुण आशान, रमाकांत देवळेकर, मनोज चौधरी यांच्यासह माजी नगरसेविका माधुरी काळे आणि अनेक प्रमुख पदाधिकारी आणि महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी नवनियुक्त शहरप्रमुख निलेश शिंदे आणि विधानसभा संघटक निलेश शिंदे यांचे अभिनंदन करण्यासाठी एकच गर्दी केली होती.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा