Home ठळक बातम्या उल्हास नदी प्रदुषणा विरोधातील निकम यांचे आंदोलन आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मध्यस्थीनंतर...

उल्हास नदी प्रदुषणा विरोधातील निकम यांचे आंदोलन आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मध्यस्थीनंतर मागे

उल्हास नदीतील जलपर्णी काढण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करणार

कल्याण दि.29 मार्च :
उल्हास नदीतील प्रदूषणा विरोधात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असणारे माजी नगरसेवक आणि मी कल्याणकर संस्थेचे प्रमुख नितीन निकम यांचे बेमुदत आंदोलन आज मागे घेण्यात आले. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मध्यस्थीनंतर तसेच उल्हास नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार असल्याच्या आश्वासनानंतर निकम यांनी आपले उपोषण मागे घेतले. दरम्यान या मुद्द्यावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने नगरविकास खात्याचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.(Nikam’s protest against Ulhas river pollution called off after the mediation of MLA Vishwanath Bhoir)

उल्हास नदीमध्ये प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात जलपर्णी तयार झाली असून त्याविरोधात माजी नगरसेवक आणि मी कल्याणकर संस्थेचे प्रमुख नितीन निकम हे गेल्या आठ दिवसांपासून नदी पात्रामध्येच आंदोलनाला बसले होते. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने नगरविकास खात्याचे प्रधान सचिव असीम गुप्ता, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह अधिकाऱ्यांची एक बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीमध्ये उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्याठी टास्क फोर्स तयार करणे, नितीन निकम यांनी केलेल्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करुन नदी पात्रातील जलपर्णी लवकर दूर करणे, ही जलपर्णी दूर करण्यासाठी १० मशीन भाडेतत्वावर घेणे, केवळ उल्हास नदीच नाही तर सर्व नदी पात्रातील पाण्यातील जलपर्णी दूर करण्यासारखे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तर उल्हास नदीला येऊन मिळणाऱ्या सांडपाण्याचे नाले बंद करण्यासाठी एसटीपी प्लांट उभारण्यासाठी एमपीसीबीकडून निधी दिला जाणार आहे. उल्हास नदीतील मोहने बंधारा जुना झाला असून तो नव्याने बांधण्यात यावा.कल्याण ते बदलापूर दरम्यान नदी पात्राचे शुद्धीकरण, नदी पात्रात रासायनिक पाण्याचे टँकर सोडल्यास टॅंकर चालक आणि सहाय्यकासह आता टॅंकर मालकाविरोधातही गुन्हा दाखल होतो. या पुढे मोक्का लावण्याची मागणी नितीन निकम यांनी केली होती. त्यावर सकारात्मक चर्चा होऊन अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी नितीन निकम यांना सांगत राज्य सरकार याप्रश्नी गांभीर्याने उपाययोजना करेल असे आश्वस्त केले. त्यानंतर निकम यांनी आपले उपोषण मागे घेतले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा