कल्याण दि. २९ एप्रिल :
येत्या मंगळवारी २ मे २०२३ रोजी कल्याण पूर्व – कल्याण पश्चिम, वडवली, शहाड आणि टिटवाळा परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. केडीएमसी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी ही माहिती दिली.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहिली, बारावे आणि टिटवाळा येथील जलशुध्दीकरण केंद्रात विद्युत तसेच यांत्रिकी उपकरणांची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामूळे येत्या मंगळवारी या जलशुध्दीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा सकाळी ९ ते रात्री ९ असा बारा तास बंद राहणार असल्याचे केडीएमसी पाणी पुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले आहे.