Home ठळक बातम्या येत्या मंगळवारी (19 डिसेंबर 2023) कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा बंद

येत्या मंगळवारी (19 डिसेंबर 2023) कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा बंद

 

कल्याण डोंबिवली दि. 17 डिसेंबर :
येत्या मंगळवारी 19 डिसेंबर 2023 रोजी कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बारावे, नेतीवली आणि मोहिली जलशुद्धिकरण केंद्रात देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता राजू राठोड यांनी दिली आहे.

या भागांत मंगळवारी पाणी नाही…
कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी आणि आसपासची गावे तसेच डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागातील पाणीपुरवठा 12 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा