कल्याण डोंबिवली दि.4 ऑक्टोबर :
वीज पुरवठा करणाऱ्या फीडरच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे केडीएमसीच्या मोहिली जलशुध्दीकरण केंद्रातून कल्याण-डोंबिवली, टिटवाळा आणि ग्रामीण भागाचा पाणी पुरवठा येत्या शुक्रवारी 6 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत बंद राहणार आहे. (Next Friday (6th October 2023) water supply to this area in Kalyan, Dombivli will be shut off.)
उल्हास नदीवरील मोहिली येथे केडीएमसीचे 150 दशलक्ष लीटर क्षमतेच्या उदंचन केंद्र असून त्याच ठिकाणच्या जलशुध्दीकरण केंद्रास टाटा पाॅवरच्या कांबा येथील उपकेंद्रातून विद्युत पुरवठा केला जातो. या उपकेंद्रात फीडरच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम शुक्रवारी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत केले जाणार आहे. परिणामी मोहिली उदंचन आणि जलशुध्दीकरण केंद्रांचा वीज पुरवठा बंद राहणार आहे. या दोन्ही केंद्रातून कल्याण-डोंबिवलीला वितरीत केला जाणारा पाणी पुरवठा शुक्रवारी 6 ऑक्टोबर रोजी 12 तासांसाठी बंद राहणार आहे.
कल्याण,डोंबिवली टिटवाळा येथील या भागाचा पाणी पुरवठा राहणार बंद…
कल्याण परिसरातील टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी, कल्याण ग्रामीण भाग, डोंबिवली पूर्व, पश्चिम भाग, कल्याण पश्चिमेतील चिकणघर, भोईरवाडी, रामबाग, घोलपनगर, मिलिंदनगर, योगीधाम, मुरबाड रोड, अशोकनगर, वालधुनी, शिवाजी नगर, जोशीबाग, बिर्ला महाविद्यालय ते खडकपाडा परिसर, कल्याण रेल्वे स्थानक परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पवार यांनी ही माहिती दिली.