कल्याण दि.७ जुलै :
ठाणे जिल्ह्याला देण्यात आलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नॅशनल डिझास्टर रेस्क्यू फोर्स अर्थातच एनडीआरएफची एक टीम कल्याण डोंबिवलीत दाखल झाली आहे. कल्याणात दाखल होतात या टीमने दुर्गाडी येथील खाडी किनाऱ्याची पाहणी करत आजूबाजूच्या सखलभागांची माहिती घेतली.
गेल्या काही वर्षांपासून कल्याण डोंबिवलीच्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. या दशकामध्ये कल्याण डोंबिवलीत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचे प्रकार वारंवार वाढत चालले आहेत. याचा विचार करता प्रशासनाने खबरदारीचे उपाय म्हणून एनडीआर एफ ची एक टीम कल्याण डोंबिवली पाठवली आहे. ही टीम विविध उपकरणांनी सुसज्ज असून कुठल्याही आपत्कालीन परिस्थिती तोंड द्यायला सज्ज आहे. पावसाळ्यात कल्याण डोंबवलीमध्ये विशेषता खाडीकिनारी आणि नदीच्या परिसरात असणाऱ्या घरांमध्ये पाणी शिरते. ज्यामुळे शेकडो लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागते. आतापर्यंत केवळ अग्निशमन दलाचे जवान हे बचाव कार्य करत होते. मात्र आता एन एन डी आर एफ ची सुसज्ज टीम दाखल झाल्यानंतर घडल्यास त्या ठिकाणी बचाव कार्य करण्यात मोठी मदत होणार आहे.
दरम्यान या पंचवीस जणांच्या पथकाने कल्याण पश्चिमेच्या खाडी किनाऱ्याची आज पाहणी करत माहिती करून घेतली. तसेच पुढील काही दिवस ही टीम कल्याण मुंबईतील विविध भागात फिरणार असल्याची माहिती या टीमचे प्रमुख राजेश यावले यांनी दिली.