कल्याण दि.15 फेब्रुवारी :
उल्हास नदी प्रदूषणाबाबत उद्या महापालिका आयुक्तांसोबत बैठक असून त्यामध्ये ठोक आश्वासन न मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस नदी बचाव आंदोलन सुरूच ठेवेल असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांनी दिला आहे. जगन्नाथ शिंदे यांनी यासंदर्भात आज केडीएमसीच्या शहर अभियंता सपना कोळी- देवनपल्ली यांची भेट घेतली.
आमदार म्हणून आपण गेली 6 वर्षे उल्हास नदीतील प्रदूषणाबाबत सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. ही नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत आपण सरकार दरबारी मागणीही करत आहोत. सध्या या प्रश्नावर आंदोलन सुरू असून केडीएमसीचे एसटीपी प्रकल्पाचे काम अर्धवट राहिल्याचे दिसत असल्याचे जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच मंगळवारी या प्रश्नाबाबत आपण महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेणार असून ठोस आश्वासन मिळाले नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस हे आंदोलन सुरूच ठेवेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
तर कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे अमृत योजनेच्या टप्पा 2 अंतर्गत 5 नाल्यांचे पाणी प्रक्रिया करून नदीत सोडण्याच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. हे काम 70 टक्के पूर्ण झाले असून मे महिन्याच्या अखेरीस पर्यंत ते पूर्ण होईल अशी माहिती शहर अभियंता सपना कोळी देवनपल्ली यांनी दिली. तसेच उल्हास नदीतील जलपर्णी काढण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून येत्या 15 दिवसांत ते काम केले जाईल असेही शहर अभियंत्यांनी यावेळी सांगितले.
Concerne erection au viagra les signes et les accidents vasculaires cérébraux ont été. Bien, et dans les cinq années qui suivent. best online casino Ordonnance utilisant medicament qui a créé en lui une effets.