
कल्याण दि.11 जानेवारी :
कोरोनामुळे सर्वासामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असताना काही महिन्यापासून सातत्याने इंधन दरवाढ सुरू आहे. पेट्रोल-डिझेल, घरगुती सिलेंडरचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य महागाईने त्रासले आहेत. याच मुद्द्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत कल्याण शिळ रोडवर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी कार्यकर्त्यांनी रस्त्यात ठिय्या देत केंद्र सरकारच्या धोरणांचा आणि इंधन दरवाढीचा निषेध केला. तसेच तहसिल कार्यालयापर्यंत हाताने दुचाकी ढकलत नेत निषेध व्यक्त केला. ‘इंधन दरवाढ कमी न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे यावेळी देण्यात आला.