Home ठळक बातम्या कल्याणातील सापर्डे गावात जाणवले गूढ हादरे; नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण

कल्याणातील सापर्डे गावात जाणवले गूढ हादरे; नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण

(प्रतिनिधिक छायाचित्र)

कल्याण दि.26 नोव्हेंबर :
कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसर व्हर्टेक्स इमारतीतील भीषण आगीमुळे एकीकडे शहरात खळबळ उडाली असतानाच कल्याणच्या सापर्डे गावाचा परिसर गूढ धक्क्यांनी हादरल्याचे समोर आले आहे. आज रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी ‘एलएनएन’ला (LNN) दिली आहे.(Mysterious tremors felt in Saparde village in Kalyan; An atmosphere of confusion among citizens)

आज रात्री 8.30 वाजण्याच्या सुमरास अचानक काही सेकंद किंवा मिलीसेकंदासाठी अचानक जमीन हादरल्याची माहिती हे हादरे जाणवलेल्या गावातील स्थानिक नागरिकांनी दिली. मात्र काही कळायच्या आतमध्ये हे हादरे जसे जाणवले तसेच थांबले अशी माहिती या स्थानिक रहिवाशांनी दिली. अचानक जाणवलेले हे हादरे नेमके कशामुळे जाणवले असावेत ह्याचे गूढ वाढले असून गावातील रहिवाशांमध्ये काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर या बाबत आसपासच्या परिसरामध्ये चौकशी केली असता त्याठिकाणी मात्र काही हादरे जाणवले नसल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान या गूढ हादऱ्यांबाबत शासकीय स्तरावरून अद्याप कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे त्याबाबत आणखीनच गूढ वाढले आहे. याबाबत कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र होऊ शकला नाही.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा