खडवली दि.१२ जुलै :
एकीकडे वीज पुरवठ्याबाबत मुंबईसह एमएमआर रिजनला स्वावलंबी बनवणाऱ्या मुंबई ऊर्जा मार्गने आपली सामाजिक बांधिलकीही जपल्याचे दिसून आले आहे. टिटवाळ्याजवळील खडवलीच्या एका गावात कित्येक वर्षांपासून असणारा पाण्याचा दुष्काळ संपवण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्गने पुढाकार घेतला आहे.
मुंबईसह एमएमआर रिजनची भविष्यातील विजेची गरज ओळखून ती पूर्ण करण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्गच्या माध्यमातून महत्वाकांक्षी अशा ट्रान्समिशन प्रकल्पाचे काम सध्या जोमात सुरू आहे. मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाच्या ट्रान्समिशन प्रकल्पाचे काम ज्या ज्या ठिकाणी सुरू आहे. तो बहुतांश ग्रामीण भाग असून तिथल्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग पुढे सरसावला आहे.
आजच्या काळात अखंड वीज ही जशी काळाची गरज बनली आहे अगदी तसेच पाण्यालाही कोणता पर्याय उपलब्ध नाही. विजेप्रमाणेच पाण्याशिवाय आपले आयुष्य हे अपूर्णच आहे. नेमका हाच धागा पकडून मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाने आपल्यातील सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे. खडवली येथील दानबाव या अत्यंत ग्रामीण परिसरातील गावामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून असणारी पाण्याची समस्या मुंबई ऊर्जा मार्गने सोडवली आहे. याठिकाणी गावामध्ये एक आणि शेतीच्या भागामध्ये २ अशा तीन बोअरवेल मुंबई ऊर्जा मार्गने बांधून दिल्या आहेत.
ज्यामुळे इथल्या घरगुती वापरासह शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्नही सुटण्यास हातभार लागला आहे. इतक्या वर्षांपासून भेडसावणारा हा पाण्याचा प्रश्न सुटल्यामुळे दानबाव गावातील महिला वर्ग अतिशय आनंदित झाला आहे. तर दुसरीकडे शेतीसाठीही आता मुबलक पाणी मिळणार असल्याने गावातील बळीराजाही सुखावला आहे.
दरम्यान मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पातर्फे येत्या काळात आणखी काही गावांमध्येही हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.