संघटनेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत निवड
मुंबई दि.29 ऑक्टोबर :
भारतातील फुटबॉल खेळाचे नियमन करणाऱ्या नामांकीत ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनशी संलग्न आणि महाराष्ट्रात फुटबॉलचे नियमन करणाऱ्या ”द वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या” (WIFA) उपाध्यक्षपदी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. या संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आणि कार्यकारी समितीच्या उपस्थितीत शनिवारी मुंबईत झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. (Mp Dr. Shrikant shinde elelcted as a vice president of western india football association )
”द वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन ही संस्था भारतात फुटबॉल खेळाचे नियमन करणाऱ्या नामांकीत ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनशी संलग्न आहे. तर, महाराष्ट्रात फुटबॉलचे नियमन देखील या संस्थेमार्फत केले जाते. महाराष्ट्रात आणि देशात फुटबॉल खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि खेळासाठी आवश्यक गोष्टींची उभारणी करण्यासाठी 1911पासून काम करणारी ही सर्वात जुनी संस्था आहे. देशातील सर्वात जुनी दुसरी स्पर्धा असलेल्या रोव्हर्स कपची सुरुवात संस्थेच्या स्थापनेपूर्वीच झाली होती.
राज्यातील फुटबॉल खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेमार्फत विविध ठिकाणी स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धांच्या माध्यमातून अनेक गुणवंत खेळाडूंना अनेक राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली आहे. या संघटनेच्या उपाध्यक्षपदी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. ”द वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या” (WIFA) कार्यकारी समितीची शनिवारी मुंबई येथे बैठक पार पडली. या बैठकीला संघटनेचे उपाध्यक्ष छत्रपती मालोजीराजे, सुनील धांडे, विश्वजीत कदम, हरेश वोरा, किरण चौगुले, ए. सलीम परकोटे, सहसचिव आणि कार्यकारी समितीस सदस्य उपस्थित होते.
ग्रामीण भागातील खेळाडूंना फुटबॉलच्या मुख्य प्रवाहात आणण्याला प्राधान्य – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
राज्यात आणि देशात फुटबॉलसाठी अत्याधुनिक सोयीसुविधा आणि पोषक वातावरण निर्माण करण्यात नक्कीच योगदान देण्याचा प्रयत्न राहणार असून ग्रामीण भागातील खेळाडूंना फुटबॉलच्या मुख्य प्रवाहात आणण्याला प्राधान्य असल्याच्या भावना यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.