Home ठळक बातम्या आज दिवसभरात कल्याण डोंबिवलीत 127 मिलिमीटरहून अधिक पाऊस

आज दिवसभरात कल्याण डोंबिवलीत 127 मिलिमीटरहून अधिक पाऊस

कल्याण डोंबिवली दि.21 जुलै :
कल्याण डोंबिवलीत आज सकाळपासून बरसणाऱ्या पावसाची आकडेवारी समोर आली आहे. आज दिवसभरात कल्याण डोंबिवलीत 127.75 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर ठाणे जिल्ह्यात ठाण्यामध्ये सर्वाधिक म्हणजेच 169.25 मिलिमीटर पाऊस झाला आहे.(More than 127 mm of rain in Kalyan Dombivli today)

आज सकाळपासून ठाणे जिल्ह्यात अक्षरशः धो धो पाऊस कोसळत असून त्यामूळे सखल भागात पाणी साचले आहे. तर कल्याण डोंबिवली परिसरातही पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळत आहे. मात्र हा पाऊस काहीसा थांबून थांबून पडत असल्याने अद्याप तरी त्याचा जनजीवनावर कोणता परिणाम झालेला दिसत नाहीये. यामध्ये केवळ कल्याण स्टेशन परिसराचा अपवाद असून इथे सॅटिसचे काम सुरू असल्याने तहसिल आणि कोर्ट परिसरातील रस्त्यावर पाणी साचत आहे.
तर जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी हे तालुके वगळता उर्वरित भागात पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

सकाळी 8.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत झालेला पाऊस

कल्याण डोंबिवली 127.75 मिमी
ठाणे 169.25
भिवंडी 123.75
अंबरनाथ 23.50
मुरबाड 49.00
शहापूर 70.00

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा