![Oplus_131072](https://www.localnewsnetwork.in/wp-content/uploads/2024/10/IMG_20241027_230709-640x681.jpg)
कल्याण दि.27 ऑक्टोबर :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फेही काही वेळापूर्वी आणखी एक उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उल्हास भोईर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये नगरसेवकपद भूषविलेले उल्हास भोईर हे आपल्या मनसे स्टाईल आंदोलनासाठी ओळखले जातात.
मनसेने जाहीर केलेल्या सहाव्या यादीमध्ये कल्याण पश्चिमेतून त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.