देशातील १६ राज्यांतून ६०० स्पर्धक होणार सहभागी
कल्याण दि. १६ एप्रिल :
येणारा रविवार हा कल्याण डोंबिवलीकरांसाठी काहीसा स्पेशल ठरणार आहे कारण कल्याण शहरात पहिल्यांदाच आमदार चषक राष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि कल्याण तालुका बुद्धिबळ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ही राष्ट्रीय स्पर्धा होत आहे. या स्पर्धेमध्ये ग्रँडमास्टर खिताब मिळवणारे आंतरराष्ट्रीय खेळाडूही सहभागी होणार आहेत.
कल्याणात कल्याण तालुका बुद्धिबळ संस्थेच्या माध्यमातून अनेक खेळाडू हे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत आहेत या या खेळाडूंच्या कौशल्याला वाव देण्यासाठी आणि या खेळाची आवड असणाऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी ही राष्ट्रीय स्पर्धा भरवण्यात आल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली या स्पर्धेतील प्रथम विजेत्याला पहिलं पारितोषिक म्हणून बाईक स्कूटर देण्यात येणार आहे तर त्यासोबतच दोन लाख रकमेची इतर पारितोषिकेही विजेत्यांना दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बैल बाजार येथील नवरंग बँकवेट हॉलमध्ये येत्या १६ एप्रिलला सकाळी ९ वाजता या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेच्या धर्तीवर ९ प्रकारांमध्ये ही स्पर्धा घेतली जाणार आहे. या सपर्धेसाठी एक हजार रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. तर ज्या होतकरू खेळाडूंना स्पर्धेत खेळायची इच्छा असेल परंतु आर्थिक परिस्थिती अभावी ते सहभागी होऊ शकत नसतील अशा विद्यार्थ्यांनी आपल्याशी संपर्क साधल्यास आपण त्यांचे प्रवेश शुल्क भरू असे आवाहनही आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी केले.
या पत्रकार परिषदेला कल्याण तालुका बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, गौरव रे, मोहित लढे, सहर्ष सोमण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी संपर्क : मोहीत लढे – 9029106570,
सहर्ष सोमण – 9321726972