कल्याण दि.28 जुलै :
ठाणे जिल्यात गेल्या चार दिवसांत विक्रमी पाऊस कोसळल्याने अनेक गावांत पुराचे पाणी शिरले. कल्याण तालुक्याला चार दिवसापासून धुवाधांर कोसळणा-या पावसामुळे कल्याण तालुक्यातील पावसामुळे उल्हास नदी दुथडी भरून वाहत असल्याचे पावसाळ्याचे पाण्याने म्हारळ, वरप, कांबा येर्थिल गावांतील घरामधले अन्नधान्यासह घरांचे मोठे नुकसान झाले. त्यासाठी कल्याण लोकसभेचे प्रतिनिधित्व करणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिनांक २६ जुलै रोजी तालुक्यातील म्हारळ, वरप, कांबा येथील पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तब्बल २ हजार कुटुंबांना ही मदत दिली जाणार आहे.
कल्याण तालुक्यातील पावसामुळे उल्हास नदी दुथडी भरून वाहत असल्याचे पावसाळ्याचे पाण्याने अनेक गावातील गटारे, नालेसफाई न झाल्याने भरभरुन वाहत होते, गावातील गल्ली, बोळाला नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते त्यामुळे गावांतील नागरिकांच्या घरी पाणी शिरून मोठ्या प्रमाणात ग्रामस्थाचे नुकसान झाले असल्याचे पाहायला मिळते. म्हारळ, वरप व कांबा या तीनही गावांना पुराचा खुप मोठा फटका बसला. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. ग्रामस्थांचे झालेले नुकसान पाहता कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी सोमवारी पूरग्रस्तांना घरगुती उपयोगी वस्तू चटई, ब्लॅंकेट, सतरंजी, टॉवेल व दैनंदिन जीवनावश्यक वस्तू तसेच धान्यांचे पॅकेटही वाटले. त्याचबरोबर पुरामुळे झालेल्या नुकसान भरपाईकरिता पंचनामे झालेले असून त्यांना शासनाच्या प्रचलित अटी- पात्रतेनुसार त्यांना शासनाकडून आर्थिक मदत तसेच नुकसान भरपाई प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
याप्रसंगी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उल्हासनगर शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपशहर प्रमुख दिलीप गायकवाड, म्हारळ गावच्या सरपंच प्रगती प्रकाश कोंगेरे, म्हारळ शहर प्रमुख डॉ. सोमनाथ पाटील, उपशहर प्रमुख अरुण तांबे, उपसरपंच अश्विनी देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.