Home कोरोना कल्याण-डोंबिवलीत 3 दिवस मार्केट बंदचा ‘तो’ मेसेज खोटा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे...

कल्याण-डोंबिवलीत 3 दिवस मार्केट बंदचा ‘तो’ मेसेज खोटा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

 

कल्याण – डोंबिवली दि.21 मार्च :
“कल्याण डोंबिवलीमध्ये सोमवारपासून 3 दिवस मार्केट बंद राहणार” असल्याच्या मेसेजने गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मात्र हा मेसेज खोटा आणि नागरिकांची दिशाभूल करणारा असून नागरिकांनी त्याकडे लक्ष न देण्याचे आवाहन केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. (message of 3 days market closure in Kalyan-Dombivali is false; Appeal not to believe the rumors)

गेल्या आठवड्यात कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्णांची मोठ्या संख्येने वाढ झाली. त्यामुळे इकडे पुन्हा एकदा लॉकडाऊन होते की काय? या भितीने अनेकांच्या मनात धडकी भरली. मात्र लॉकडाऊन न करता केवळ निर्बंध घातले जाणार असल्याचे केडीएमसी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र तरीही 2-3 दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने सोशल मिडीयावर “कल्याण आणि डोंबिवली मध्ये सोमवारपासून तीन दिवस मार्केट बंद राहणार आहे बाहेरून काही येणार नाही तरी भाजी किराणा सामान 4/5 दिवस पुरेल असे भरून ठेवा” अशा आशयाचा खोटा मेसेज पोस्ट केला. मात्र अनेक जागरूक नागरिकांनी हा मेसेज फॉरवर्ड न करता ‘एलएनएन’कडे याबाबत विचारणा करत त्याची शहानिशा केली. त्यावेळी मार्केट बंद ठेवायचे असे कोणतेही आदेश केडीएमसीने दिले नसल्याचेच एलएनएनकडून सांगण्यात आले. मात्र काही जणांनी कोणतीही शहानिशा न करता हा मेसेज सर्वत्र पसरवत अज्ञात व्यक्तीच्या मनसूब्यांना अप्रत्यक्षपणे हातभार लावला. त्यामूळे कल्याण डोंबिवलीमध्ये 3 मार्केट बंदच्या अफवांचे एकच पीक आलेले पाहायला मिळाले.

 

मात्र सोशल मीडियावर पसरवण्यात आलेला हा मेसेज खोटा आणि नागरिकांची दिशाभूल करणारा असून त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. मार्केट बंद करण्याचे कोणतेही आदेश प्रशासनाने काढले नसल्याचे आवाहन केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा