Home ठळक बातम्या मानसिक आरोग्य ; सारथी कौन्सिलिंगचा “लेट्स टॉक मेंटल हेल्थ” उपक्रम

मानसिक आरोग्य ; सारथी कौन्सिलिंगचा “लेट्स टॉक मेंटल हेल्थ” उपक्रम

मानसिक आरोग्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती

कल्याण दि.31 मार्च :
मानसिक आरोग्य.. मानसिक आरोग्य म्हणजे आपल्या भावना, विचार आणि वर्तनाचे संतुलन राखणे, ज्यामुळे आपण तणाव आणि समस्यांना सामोरे जाऊ शकतो, चांगले निर्णय घेऊ शकतो आणि आनंदी जीवन जगू शकतो. मात्र सध्याच्या बदललेली जीवनशैली आणि अति ताण-तणावाच्या काळात प्रत्येकालाच मानसिक आरोग्य सांभाळणे कठीण होऊन बसले आहे. नेमका हाच धागा पकडून कल्याणातील सारथी कौन्सिलिंगतर्फे “लेट्स टॉक मेंटल हेल्थ” हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.(Mental Health; Sarathi Counseling’s “Let’s Talk Mental Health” initiative)

या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून कल्याणातील विविध नागरिकांशी संपर्क साधून त्यांना मानसिक आरोग्य म्हणजे काय आणि आपल्या जीवनातील त्याचे महत्त्व याबाबत जनजागृती करण्यात आली.

मानसिक आरोग्य म्हणजे केवळ आजार नसणे नव्हे, तर आपल्या भावना, विचार आणि वर्तनाचे योग्य संतुलन राखणे. चांगले मानसिक आरोग्य असणे म्हणजे आपण जीवनातील ताण आणि समस्यांना प्रभावीपणे सामोरे जावू शकतो, योग्य निर्णय घेऊ शकतो आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो, आपण इतरांशी चांगले संबंध निर्माण करू शकतो, समाजात सक्रियपणे सहभागी होऊ शकतो, आपल्या भावना- गरजा ओळखून त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण स्वतःवर आणि आपल्या निर्णयांवर विश्वास ठेवल्याने जीवनात आनंदी आणि समाधानी राहतो अशी माहिती यावेळी सारथी कौन्सिलिंगच्या संस्थापक आणि मानसोपचार तज्ज्ञ कृपा राठोड यांनी दिली.

मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी काय करावे?
नियमित व्यायाम, संतुलित, योग्य आणि पौष्टिक आहार, पुरेशी झोप, ध्यान आणि योगा, मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवणे, सामाजिक संबंध मजबूत करणे, मानसिक आरोग्याच्या समस्या असल्यास तज्ञांकडून मदत घेणे आवश्यक असल्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

अधिक माहितीसाठी संपर्क :
सारथी कौन्सिलिंग अँड ट्रेनिंग सेंटर,
1ए, पुण्योदय स्कायलाउंज, वेलनेस मेडिकलच्या वर, राजा हॉटेलसमोर, अहिल्याबाई चौक, कल्याण – प
मोबाईल : 9819852537

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा