Home ठळक बातम्या नरेंद्र पवारांची जबाबदारी आपण आणि देवेंद्रेजींनी घेतलीय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची...

नरेंद्र पवारांची जबाबदारी आपण आणि देवेंद्रेजींनी घेतलीय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पवार समर्थकांना ग्वाही

माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह समर्थकांची घेतली भेट

कल्याण दि.5 नोव्हेंबर :
राज्यामध्ये अडीच वर्षे महाविकास आघाडीची सत्ता असताना आपण सर्व जण वनवासात होतो. मात्र आपल्याला पुन्हा एकदा वनवासात जायचे नसून त्यासाठी महायुतीचे सरकार येणे आवश्यक असल्याचे सांगत नरेंद्र पवार यांची जबाबदारी आपण आणि देवेंद्र फडणवीसांनी घेतल्याचे सूतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.(Me and Devendreji have taken the responsibility of Narendra Pawar – Chief Minister Eknath Shinde to Pawar supporters)

माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्याविरोधात दाखल केलेली उमेदवारी मागे घेतली. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणातील निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनानंतर नरेंद्र पवार आणि त्यांच्या समर्थकांची पवार यांच्या निवासस्थानी भेट घेतली. आणि नरेंद्र पवार तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीची सत्ता पुन्हा येणे आवश्यक असल्याचे नरेंद्र पवार आणि त्यांच्या समर्थकांना पटवून दिले. त्यावेळी काही जणांनी मग नरेंद्र पवार साहेबांचे काय असा थेट प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची जबाबदारी घेतली असल्याचे स्पष्ट करताच उपस्थित समर्थकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत केले.

तर नरेंद्र पवार यांनी कल्याण मेट्रो, रिंगरोड प्रकल्प, घनकचरा प्रकल्प, मल्टीस्पेशलेटी हॉस्पिटल आणि डॉ. आंनदीबाई जोशी स्मारक प्रकल्प रखडल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनीही त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याचे आश्वासन पवार यांना दिले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा