
कल्याण ग्रामीण दि.6 नोव्हेंबर:
सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी डोंबिवली येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मराठा उत्कर्ष मंडळाने कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार माजी आमदार सुभाष भोईर यांना पाठींबा जाहीर केला आहे.
मराठा उत्कर्ष मंडळ, डोंबिवली हे गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ सामाजिक कार्यात सहभागी आहे. तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक वर्ग मोठ्या संख्येने या मंडळात कार्यरत आहेत. मंडळाचे सुमारे ७०० सदस्य कार्यरत आहेत. मंडळाच्या कार्यकारिणीने ठरवल्यानुसार सुभाष भोईर यांना हा पाठिंबा देत असल्याचे पत्र त्यांनी सुभाष भोईर यांना देऊन आई भवानीच्या कृपेने यश मिळून आपणास पुनश्च लोकसेवेची संधी मिळो, अशा भावना या संस्थेकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत.