
कल्याण दि.15 जून :
आपल्या स्वतःच्या इच्छा मुलांवर लादण्यापेक्षा त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात पाठवून त्यांचं आयुष्य आनंदी करण्याचे आवाहन गुरुकुल सायन्स क्लासेसचे सीईओ वैभव ठाकरे यांनी केले आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गुरुकुल सायन्स क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. कल्याणातील सूर्यकिरण हॉलमध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झालेल्या या बक्षीस वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
गुरुकुल सायन्स क्लासेसच्या 40 हून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत 90 टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले आहेत. तर 100 हून अधिक विद्यार्थी हे अत्यंत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने गुरुकुल क्लासेसतर्फे 150 विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे या सोहळ्यात कौतुक करण्यात आले.
यावेळी गुरुकुलच्या संचालिका भाग्यश्री ठाकरे ,मोटीवेशनल स्पीकर आणि माईंड गुरू डॉ. दिनेश गुप्ता, वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी – तज्ञ प्राध्यापिका डॉ. भारती शुक्ला, आदी मान्यवर व सर्व स्टाफ उपस्थित होते. अतिशय उत्साहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व पालकांनी टीम गुरूकुलचे मनापासून आभार मानले.