Home ठळक बातम्या आज रात्रीपासून कल्याण शीळ महामार्गावरील वाहतुकीत मोठे बदल

आज रात्रीपासून कल्याण शीळ महामार्गावरील वाहतुकीत मोठे बदल

डोंबिवली दि.१५ डिसेंबर :

कल्याण शीळ रोडवरील वाहतुकीत आज रात्रीपासून मोठे बदल होणार आहेत. कल्याण-शीळ रोडवरील लोढा पलावा जंक्शन येथे देसाई खाडीवर नवीन पुलाचे काम करण्यासाठी येत्या २२ डिसेंबर पर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. शीळ फाट्याकडून कल्याणकडे येणाऱ्या मार्गावरील पुलावर गर्डर ठेवण्याचे काम केले जाणार आहे.
पुलाचे गर्डर टाकण्यासाठी आज रात्रीपासून म्हणजेच १५ डिसेंबरपासून ते २२ डिसेंबर या दरम्यान रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत हे गर्डर टाकण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. तसेच मानपाडा रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामानिमित्त देखील वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत.

असे आहेत वाहतुकीचे बदल…

या मार्गावरून प्रवेश बंद –
शीळ फाट्याकडून कल्याणकडे येणाऱ्या मार्गावर सर्व प्रकारच्या जड – अवजड वाहनांना शीळ (कल्याण) फाटा येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग – कल्याण फाटा ( शीळ रोड) कडून कल्याण कडे जाणारी सर्व प्रकारची जड-अवजड वाहने ही कल्याण फाटा-मुंब्रा बायपास मार्गे खारेगाव टोलनाका मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद – कल्याणकडून शीळ फाट्याकड़े जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड – अवजड वाहनांना बदलापूर चौक (काटई नाका) येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग – कल्याणकडून कल्याण फाट्याकडे जाणारी सर्व प्रकारची जड अवजड वाहने ही बदलापूर (काटई नाका) – खोणी नाका – तळोजा एमआयडीसीमार्गे इच्छितस्थळी जातील.

त्याशिवाय मानपाडा रस्त्याच्या काँक्रीटीकरणच्या कामानिमित्तही त्या मार्गावरील वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा