
डोंबिवली दि.14 नोव्हेंबर :
महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गणू भोईर यांची डोंबिवली शहरामध्ये भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. ज्यामध्ये शिवसेना सचिव, सिनेअभिनेते आणि होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकर यांच्या विशेष उपस्थिती ही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. डोंबिवलीच्या आयरे गाव हनुमान मंदिरातून सुरु करण्यात आलेली ही रॅली बालाजी गार्डन, स्वामी विवेकानंद शाळा, अयप्पा मंदिर, मढवी शाळा, ओम बंगला, तुकाराम नगर, सुनील नगर, मारुती महादेव नगर, शांती नगर, जैन मंदिर, मॉडेल शाळा, गांधी नगर, पीअँडटी कॉलनी, महावीर हॉस्पिटल, सुभाष डेअरी, रामचंद्र नगर, शांताबाई नाका, गोग्रासवाडी या भागातून काढण्यात आली.
यावेळी प्रचारामध्ये उमेदवार सुभाष भोईर यांना मिळालेला प्रतिसाद पाहून त्यांचा विजय निश्चित असल्याचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांनी सांगितले.
या रॅलीमध्ये कॉंग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे, कल्याण लोकसभा समन्वयक संतोष जाधव, संपर्क संघटिका मृणाल यज्ञेश्वर, जिल्हा संघटिका वैशाली दरेकर, उपजिल्हा प्रमुख तात्या माने, जिल्हा युवा अधिकारी प्रतिक पाटील, शहर प्रमुख अभिजित सावंत, शहर संघटिका मंगला सुळे, उप शहर प्रमुख सुधाकर वायकोळे, विभागप्रमुख राहुल भगत, विनायक गोवळकर, शंकर राउळ, रमेश कदम, मंगेश मोरे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी उपस्थित होते.