कल्याण ग्रामीण दि.10 नोव्हेंबर :
१४४ कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गणू भोईर यांच्या शिळ देसाई विभागात काढण्यात आलेल्या प्रचारफेरीला जोरदार प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. यामध्ये नागरिकांनी केलेली अलोट गर्दी पाहून भारावून गेल्याची भावना उमेदवार सुभाष गणू भोईर यांनी व्यक्त केली. तर ठिकठिकाणी होत असलेले स्वागत आणि पाठींबा पाहून आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Mahavikas Aghadi candidate Subhash Bhoir campaigning in Shil-Desai division)
महाविकास आघाडीने कल्याण कल्याण ग्रामीण विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा धडाका लावला असून गावागावात प्रचाररॅली काढण्यात येत आहेत. शिळ देसाई विभागात खिडकाळी, रीवरवूड पार्क, देसाई, पडले, मोठी देसाई, डायघर, शिळ या भागातून प्रचार रॅली काढण्यात आली. देसाई गावात माजी आमदार सिताराम भोईर आणि देसाई गावचे अध्यक्ष बाळाराम पाटील यांनी स्वागत केले.
यावेळी कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष केणे, कॉंग्रेस पक्षाचे कल्याण ग्रामीण अध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, विभागप्रमुख वैकुंठ म्हात्रे, विश्वनाथ पाटील, शाखाप्रमुख, युवा सेना उप जिल्हा अधिकारी स्वप्निल पावशे, गुरुनाथ पाटील, पंढरी पाटील, बाळकृष्ण पाटील, यशवंत पाटील, सचिन म्हात्रे, किशोर म्हात्रे, विश्वनाथ म्हात्रे, दिलीप पाटील, प्रतिक पाटील, विष्णू पाटील, शशी पाटील, वासुदेव पाटील, रमा पाटील, श्याम काठे, मोरेश्वर आलीमकर, करीम खान, युवासेना राजू अंसारी यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक प्रचार रॅली मध्ये सहभागी झाले होते.