Home ठळक बातम्या कल्याण पश्चिमसह संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीचीच सत्ता येणार – महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर...

कल्याण पश्चिमसह संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीचीच सत्ता येणार – महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांचा विश्वास

प्रचार रॅलीच्या माध्यमातून टिटवाळा परिसर काढला पिंजून

कल्याण दि.7 नोव्हेंबर :
शिवसेना, भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआयसह महायुतीतील प्रत्येक घटक पक्ष प्रचंड ताकदीने मेहनत करत आहोत. त्यामुळे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा या महायुतीचीच सत्ता येणार असा ठाम विश्वास महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला आहे. विश्वनाथ भोईर यांनी आज सलग तिसऱ्या दिवशी टिटवाळा परिसरात प्रचार रॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. टिटवाळा येथील वाजपेयी चौकापासून सुरू झालेल्या या रॅलीमध्ये महायुतीचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी आणि शेकडो महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. (Maha Yuti will come to power in entire Maharashtra including Kalyan West – Maha Yuti candidate Vishwanath Bhoir)

येथील वाजपेयी चौक मार्गे सुरू झालेली विश्वनाथ भोईर यांची ही प्रचार रॅली टिटवाळा मुख्य मार्केट, रिजेंसी सर्वम, पटेल मार्ट, डी जी वन,स्वामी विवेकानंद चौक, धर्मवीर आनंद दिघे मार्ग, इंदिरा नगर बुद्धविहारमार्गे नांदप येथे समाप्त झाली. यावेळी उपस्थित शेकडो समर्थकांकडून विश्वनाथ भोईर आगे बढो, शिवसेना झिंदाबाद, महायुतीचा विजय असो अशा विविध घोषणांनी संपूर्ण टिटवाळा परिसर दणाणून सोडलेला पाहायला मिळाला. तर या रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या लाडक्या बहिणींची लक्षणीय उपस्थिती ही विशेष आकर्षण ठरली.

टिटवाळा पर्यटन क्षेत्र घोषित करण्यासाठी पाठपुरावा – विश्वनाथ भोईर
गेल्या तीन दिवसांपासून आपण टिटवाळा परिसरात रॅलीच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत हा परिसर पिंजून काढला आहे. आमची प्रचार फेरी जिकडे जातेय तिकडे नागरिक आणि मतदार स्वतःहून आम्हाला हात उंचावून सकारात्मक प्रतिसाद देत आहेत याचा अर्थ ते आपल्या पाठीशी उभे असल्याचा निर्वाळा आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केला. तर या परिसराचा अधिकाधिक विकास होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे आपण टिटवाळ्याला पर्यटन क्षेत्र घोषित करण्यासाठी पाठपुरावा केला आहे. महायुतीची पुन्हा सत्ता आणि आपण पुन्हा निवडून आल्यावर हे काम पूर्ण करू अशी ग्वाहीही विश्वनाथ भोईर यांनी यावेळी दिली.

या प्रचार रॅलीमध्ये विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, भाजपचे मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर, संतोष (आप्पा) तरे, अजय सावंत यांच्यासह महायुतीतील मित्रपक्षांचे सर्व प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होती.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा