Home ठळक बातम्या सकल हिंदू समाज, महालक्ष्मी प्रतिष्ठानतर्फे कल्याणच्या पेशवेकालीन श्री महालक्ष्मी मंदिरात झाली महाआरती

सकल हिंदू समाज, महालक्ष्मी प्रतिष्ठानतर्फे कल्याणच्या पेशवेकालीन श्री महालक्ष्मी मंदिरात झाली महाआरती

शंख आणि संबळ वादनाने भारावून गेले वातावरण

कल्याण दि.7 ऑक्टोबर :
कल्याणातील प्राचीन मंदिरांपैकी एक आणि पेशवेकालीन मंदिर अशी ओळख असलेल्या टिळक चौकातील श्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्रीचा पाचवा दिवस काहीसा खास ठरला. आजच्या ललित पंचमीचे औचित्य साधून कल्याणातील सकल हिंदू समाज आणि श्री महालक्ष्मी प्रतिष्ठानमार्फत महालक्ष्मी मंदिरात महाआरती करण्यात आली.(Maha Aarti was organized by Sakal Hindu Samaj, Mahalakshmi Pratishthan at the Peshwa-era Shree Mahalakshmi Temple of Kalyan)

कल्याणचे ग्राम दैवत अशी ओळख असलेल्या किल्ले दुर्गाडी येथील दुर्गा देवी मंदिररानंतर कल्याण पश्चिमेतील या श्री महालक्ष्मी मंदिराची सर्वत्र ख्याती आहे. कोल्हापूर येथे असलेल्या मूळ महालक्ष्मी मंदिरातील देवीसारखी हुबेहूब मूर्ती कल्याणच्या या महालक्ष्मी मंदिरात आढळून येते. त्यामुळे या मंदिरातही केवळ कल्याणच नव्हे तर आसपासच्या परिसरातील शेकडो भाविक नवरात्रौत्सव काळात दर्शनाला येत असतात.

या पार्श्वभूमीवर आजच्या ललित पंचमीनिमित्त सकल हिंदू समाज, श्री महालक्ष्मी प्रतिष्ठानच्या माध्यमातून याठिकाणी झालेल्या महाआरतीलाही भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. महालक्ष्मी प्रतिष्ठानच्या महिला सदस्यांना या आजच्या आरतीचा मान मिळाल्याने या महिलाभक्तांनी अतिशय सुंदर स्वरामध्ये ही आरती म्हटली. तर या जोडीला शंख आणि संबळ वादनाने इथले वातावरण अधिकच भारावून गेले.

खालील लिंकवर पाहा व्हिडिओ…👇👇👇👇👇
https://www.instagram.com/reel/DA09vGCuSWK/?igsh=b2tzazNiMWJxY240

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ सदस्य मधुकर फडके, माजी विस्तारक डॉ. विवेक मोडक, कल्याण पश्चिमेचे विद्यमान विस्तारक विवेक वाणी, पराग तेली, डॉ. दिपक वझे, श्री महालक्ष्मी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि उपशहर प्रमुख नितीन माने यांच्यासह अनेक मान्यवर या महाआरती मध्ये सहभागी झाले होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा