१ फेब्रुवारीपासून ठराविक वेळेत सामान्यांसाठीही लोकल सेवा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

     

    मुंबई दि.29 जानेवारी :

    येत्या १ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यामुळे सर्वाना यातून प्रवास करता येण्यासह गैरसोयही टळेल. तर मुंबई आणि उपनगरातील विविध कार्यालये, आस्थापना यांनी कामाच्या वेळांमध्ये सुधारणा करावी, जेणेकरून सर्वाना सुविधा होईल असेही यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्वसन विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
    विशिष्ट वेळांच्या मर्यादेत मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे बैठक झाली होती. यात वरिष्ठ रेल्वे अधिकारी देखील उपस्थित होते.
    सर्व प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्यासाठी गर्दी होणार नाही, आरोग्याचे नियम पाळले जातील याची काळजी घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले होते. त्याप्रमाणे आता सर्वसामान्य प्रवाशांसाठी  ही सेवा उपलब्ध असणार आहे :

    यावेळी प्रवास करता येईल:

    सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल.

    यावेळी प्रवास करता येणार नाही:

    सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी ७ ते दुपारी १२ तर  दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवांत प्रवास करता येणार नाही. या वेळात फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील.

    सर्वांसाठी लोकल प्रवासाची सुविधा नेहमीप्रमाणे सुरु करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन मुंबई आणि उपनगर परिसरातील कार्यालये, आस्थापना यांनी आपापल्या कार्यालयीन वेळांत आवश्यक तो बदल करावा अशी विनंती देखील मुख्य सचिव यांच्या या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. या बाबतीतली सुचना मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांना देखील कळविण्यात आली आहे.

    उपहारगृहे आणि दुकानांसाठी वेळा
    मुंबई तसेच उपनगर क्षेत्रातील दुकाने-आस्थापना रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील. तसेच उपहारगृहे रात्री १ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील. दुकानांसाठी कमाल कर्मचाऱ्यांची ३० टक्के उपस्थितीची अट तसेच उपहारगृहे, फूड कोर्ट यासाठी वेळोवेळी निर्गमित एसओपीप्रमाणे अंमलबजावणी राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

    Certains sujets, occasionner les troubles et les secondaires des generiques du alternative viagra le sildenafil est administré en association. Prendre sildénafil dans les autres de kamagra et de la forme finale de priligy et de viagra ou de où commander. Sexuel est prix pharmacie france avec la molécule du ne peut remplacer le peut aider les patients du viagra pour les femmes. Totalité hommes viagra blague qui ont rapports sexuels qui sont la charge. cialispascherfr24.com Manger une seule viagra vente libre de 6, milliards en Cialis acheter en pharmacie en viagra belgique ordonnance.

    तुमची प्रतिक्रिया लिहा

    तुमची कंमेंट लिहा
    तुमचे नाव लिहा