Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीतील मतमोजणीचे Live Updates : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात महायुतीचे विश्वनाथ...

कल्याण डोंबिवलीतील मतमोजणीचे Live Updates : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात महायुतीचे विश्वनाथ भोईर यांचा 42 हजारांहून अधिक मतांनी विजय

सायंकाळी 6.15 : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ : महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर 42 हजार 454 मतांनी विजयी…* विश्वनाथ भोईर यांना 1 लाख 26 हजार 20, सचिन बासरे यांना 83 हजार 566 आणि मनसेचे उल्हास भोईर यांना 22 हजार 114 मते…

सायंकाळी 5.11 : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार राजेश मोरे 66 हजार हजारांहून अधिक मतांनी विजयी…महायुतीचे राजेश मोरे यांना 1 लाख 41 हजार 164, मनसेचे राजू पाटील यांना 74 हजार 768 आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष भोईर यांना 70 हजार 62 इतकी मते…

दुपारी 3.55 : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर 19 व्या फेरीनंतर 35 हजार 810 मतांनी आघाडीवर…

दुपारी 3.31 : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ 25 वी फेरी: महायुतीचे उमेदवार राजेश मोरे 58 हजार 782 मतांनी आघाडीवर

दुपारी 3.28 : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर 17 व्या फेरीनंतर 31 हजार 500 मतांनी आघाडीवर…

दुपारी 3.04. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर 15 व्या फेरीनंतर 25 हजार 700 मतांनी आघाडीवर…

दुपारी 2.42 कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवार सुलभा गणपत गायकवाड 25 हजारांहून अधिक मतांनी विजयी…विजयाची अधिकृत घोषणा अद्याप बाकी…मतमोजणीच्या अखेरच्या म्हणजे 24 व्या फेरीनंतर सुलभा गायकवाड यांना 81 हजार 144 मते, अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांना 54,784 आणि महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय बोडारे यांना 39,098 मते…

दुपारी 2.32 : डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार रविंद्र चव्हाण 75 हजारांहून अधिक मतांनी विजयी… विजयाची अधिकृत घोषणा बाकी.. मतमोजणीच्या अखेरच्या म्हणजे 21 व्या फेरीनंतर रविंद्र चव्हाण यांना 1 लाख 23 हजार 815 मते तर दिपेश म्हात्रे यांना 46 हजार 709 मते…

दुपारी 2.06 : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ 20 वी फेरी: महायुतीचे उमेदवार राजेश मोरे 52 हजार 150 मतांनी आघाडीवर

दुपारी 1.58 कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर 13 व्या फेरीनंतर 23 हजार मतांनी आघाडीवर…

दुपारी 1.44 कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ 20 वी फेरी : महायुतीच्या उमेदवार सुलभा गणपत गायकवाड 20 हजार 975 मतांनी आघाडीवर.

दुपारी 1.35 : डोंबिवली विधानसभा मतदारसंघात 15 व्या फेरीनंतर महायुतीचे उमेदवार रविंद्र चव्हाण 54 हजार 487 मतांनी आघाडीवर…

दुपारी 1.28 : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर 11 व्या फेरीनंतर 19 हजार मतांनी आघाडीवर…

दुपारी 12.53.:.कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ 15 वी फेरी : महायुतीचे उमेदवार राजेश मोरे 38 हजार 736 मतांनी आघाडीवर

दुपारी 12.51.: कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ 15 वी फेरी : महायुतीच्या उमेदवार सुलभा गणपत गायकवाड 11 हजार 537 मतांनी आघाडीवर.

दुपारी 12.44 : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर 9 व्या फेरीनंतर 14 हजार मतांनी आघाडीवर…

दुपारी 12.27: कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ 13 वी फेरी : महायुतीच्या उमेदवार सुलभा गणपत गायकवाड 8 हजार 538 मतांनी आघाडीवर.

दुपारी 12.22 : डोंबिवली विधानसभा मतदारसंघात 10व्या फेरीनंतर महायुतीचे उमेदवार रविंद्र चव्हाण 31 हजार 764 मतांनी आघाडीवर…महायुती उमेदवार रविंद्र चव्हाण यांना 59 हजार 371 मते आणि महाविकास आघाडीचे दिपेश म्हात्रे यांना 27 हजार 607 मते…

दुपारी 12.01 : डोबिवली विधानसभा मतदारसंघात आठव्या फेरीनंतर महायुतीचे उमेदवार रविंद्र चव्हाण यांची 23 हजार 530 मतांची आघाडी…महायुती उमेदवार रविंद्र चव्हाण यांना 47 हजार 322 मते आणि महाविकास आघाडीचे दिपेश म्हात्रे यांना 23 हजार 792 मते…

दुपारी 12.00 : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राजेश मोरे 29 हजार मतांनी आघाडीवर..

सकाळी 11.48.: कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ 10 वी फेरी : महायुतीच्या उमेदवार सुलभा गणपत गायकवाड 3 हजार 915 मतांनी आघाडीवर. महायुतीच्या सुलभा गायकवाड यांना 30 हजार 750 मते, अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांना 26835 मते आणि महाविकास आघाडीचे धनंजय बोडारे यांना 16 हजार 110 मते

सकाळी 11.19.: कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार सुलभा गणपत गायकवाड आठव्या फेरीअखेर 3 हजार 478 मतांनी आघाडीवर. महायुतीच्या सुलभा गायकवाड यांना 24 हजार 628 मते, अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांना 21150 मते आणि महाविकास आघाडीचे धनंजय बोडारे यांना 13 हजार 195 मते

सकाळी 11.17 : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार 8 व्या फेरीअखेर राजेश मोरे 20 हजार मतांनी आघाडीवर…राजेश गोवर्धन मोरे 39 हजार 005 मते, महाविकास आघाडीचे सुभाष भोईर 16 हजार 036, मनसेचे राजू पाटील 18 हजार 214 मते…

सकाळी 11.01 : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर 25 हजार मतांनी आघाडीवर…

सकाळी 10.50 : डोंबिवली विधानसभा मतदारसंघात महायुतीचे रविंद्र चव्हाण 12 हजार मतांनी आघाडीवर…

सकाळी 10.49 : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राजेश मोरे 18 हजार मतांनी आघाडीवर

सकाळी 10.48.: कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार सुलभा गणपत गायकवाड सहाव्या फेरीअखेर 3 हजार 475मतांनी आघाडीवर…

सकाळी 10.37 : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राजेश मोरे 14 हजार मतांनी आघाडीवर

सकाळी 10.35 : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड 5 हजार 639 मतांनी आघाडीवर

सकाळी 10.34 : डोंबिवली विधानसभा मतदारसंघात महायुतीचे रविंद्र चव्हाण 9 हजार मतांनी आघाडीवर…

strong>सकाळी 10.22: कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर 13 हजार मतांनी आघाडीवर…

strong>सकाळी 10.15 : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राजेश मोरे 11 हजार मतांनी आघाडीवर

strong>सकाळी 10.03 : डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रविंद्र चव्हाण 6 हजार 777 मतांनी आघाडीवर

सकाळी 9.55 : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर 10 हजार मतांनी आघाडीवर

सकाळी 9.54 : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात तिसरी फेरीखेर राजेश मोरे 8 हजार 725 मतांनी आघाडीवर

सकाळी 9.40 : : दुसऱ्या फेरीमध्येही भाजपच्या सुलभा गायकवाड 981 मतांनी आघाडीवर

सकाळी 9.35 : : दुसऱ्या फेरी अखेर राजेश मोरे ५००० मतांनी आघाडीवर


सकाळी 9.20: :कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या पहिल्या फेरीची आकडेवारी

सकाळी 9.15 : : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सुलभा गायकवाड 776 मतांनी आघाडीवर..

सकाळी 9.10 : : डोंबिवली विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण 2 हजार 228 मतांनी आघाडीवर

सकाळी 9.09 : : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेना महायुतीचे उमेदवार राजेश मोरे २ हजार ७०३ मतांनी आघाडी

सकाळी 8.07 : कल्याण डोंबिवलीमध्ये टपाली मतदानाची मोजणी सुरू…

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा