Home कोरोना कल्याण डोंबिवलीत 12 जुलैपर्यंत लेव्हल 3 चे निर्बंध कायम; पालिका आयुक्तांचे आदेश

कल्याण डोंबिवलीत 12 जुलैपर्यंत लेव्हल 3 चे निर्बंध कायम; पालिका आयुक्तांचे आदेश

 

कल्याण – डोंबिवली दि. 3 जुलै :
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात पुढील आठवड्यापर्यंत म्हणजेच 12 जुलैपर्यंत लेव्हल 3 चे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. या आठवड्यातील निर्बंध 5 जुलै पर्यंत लागू आहेत. केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याबाबत शुक्रवारी नविन आदेश देत 12 जुलैच्या सकाळी 7 वाजेपर्यंत लेव्हल 3 चे सर्व निर्बंध जसेच्या तसे कायम ठेवले आहेत. (Level 3 restrictions in Kalyan Dombivali till July 12; Orders of Municipal Commissioner)

कोवीडच्या नव्या डेल्टा प्लस विषाणूचा धोका पाहता राज्य शासनाने गेल्या आठवड्यापासून नविन निर्बंध लागू केले आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांचा आता लेव्हल 3 मध्ये समावेश करण्यात आला असून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातही त्यानुसार निर्बंध लागू होत आहेत. केडीएमसीचा लेव्हल 2 मध्ये समावेश झाल्याने निर्बंध बऱ्यापैकी शिथिल झाले होते.  मात्र राज्य शासनाच्या नव्या निर्णयामुळे केडीएमसीलाही लेव्हल 3 मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यानूसार सर्व निर्बंध यापूर्वीच लागू करण्यात आले आहेत.

असे आहेत निर्बंध…

१. सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने सायं.४.०० वा. पर्यंत सुरू राहतील.

२. अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर वस्तूंचा व्यवहार करणाऱ्या आस्थापना सोमवार ते शुक्रवार सायं.४.०० वा. पर्यंत सुरू राहतील.

३. मॉल्स/सिनेमागृहे (मल्टिप्लेक्ससह एकल स्क्रिन)/नाटयगृहे इत्यादी बंद राहतील.

४. रेस्टॉरंट्स सोमवार ते शुक्रवार ५०% बैठक क्षमतेने सायं. ४.०० वा. पर्यंत सुरू राहतील. मात्र, सायं.४.०० वा.नंतर व शनिवारी आणि रविवारी फक्त टेक अवे/पार्सल सर्व्हिस आणि होम डिलेव्हरी सेवा सुरू राहील.

 

६. सार्वजनिक ठिकाणे/खुली मैदाने/चालणे/ सायकलिंग दररोज सकाळी ५.०० वा.पासून सकाळी ९.०० वा.पर्यंत सुरू राहतील.

७. खाजगी कार्यालये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सायं. ४.०० वाजेपर्यंत (सुट देण्यात आलेली कार्यालये वगळून) सुरू राहतील.

८. कार्यालयीन उपस्थिती- शासकीय कार्यालयांसह (खाजगी- जर परवानगी असेल) ५०% क्षमतेने सुरू राहतील.

९. क्रिडा- सकाळी ५.०० वा.पासून सकाळी ९.०० वा./ सायं.६.०० वा. पासून सायं.९.०० पर्यंत फक्त मैदानी खेळांना परवानगी राहील.

१०. चित्रीकरण Bubble च्या आतमध्ये सायं. ४.०० वा. पर्यंत सुरू ठेवता येईल व सायं.५.०० नंतर कोणासही हालचाल करता येणार नाही.

११ . सामाजिक मेळावे / सांस्कृतिक / करमणूक ५०% बैठक क्षमतेने सोमवार ते शुक्रवार सायं. ४.०० वा पर्यंत.सुरू राहतील.

१२. लग्न समारंभ फक्त ५० लोकांच्या मर्यादेतच करता येतील.

१३. अंत्यसंस्कार विधी फक्त २० लोकांच्या उपस्थितीमध्ये करता येईल.

१४. बैठका/स्थानिक संस्थांच्या/ सहकारी संस्थांच्या निवडणूका हॉलच्या/सभागृहाच्या ५०% बैठक क्षमतेने घेणेस परवानगी राहील.

१५. बांधकामाकरीता केवळ ऑनसाईट मजूर राहणाऱ्या ठिकाणी किंवा सायं.४.०० वा.पर्यंत कामगारांनी कामाचे ठिकाण सोडले पाहिजे या अटीवर परवानगी असेल.

१६. कृषि सेवा दुकाने परवानगी दिलेल्या वेळेत सूरु राहतील.

१७. ई-कॉमर्स- साहित्य व सेवा पूर्वीप्रमाणे नियमित सुरू राहतील.

१८. जमावबंदी सांय. ५.०० वा. पर्यंत व संचारबंदी सायं ५.०० वा. नंतर लागू राहील.

१९. व्यायामशाळा/केश कर्तनालय/ ब्युटी सेंटर्स/ स्पा/ वेलनेस सेंटर्स सायं. ४.०० पर्यंत ५०% क्षमतेने सुरु राहतील. परंतू, गि-हाईकांना पूर्वनियोजित वेळ ठरवूनच यावे लागेल. तसेच वातानुकूलन यंत्रणेचा वापर करता येणार नाही.

२०. सार्वजनिक परिवहन सेवा १००% बैठक क्षमतेने सुरू राहतील. परंतू, प्रवाश्यांना उभे राहून प्रवास करता येणार नाही.

२१ . मालवाहतूक जास्तीत जास्त ३ व्यक्तींसह (वाहन चालक/ हेल्पर/ स्वच्छक किंवा इतर असे ३ ) लागू असलेल्या सर्व नियमांसह नियमितपणे सुरू राहील.

२२. खासगी कार / टॅक्सी / बस लांब पल्ल्याच्या गाड्यांद्वारे प्रवासासाठी (आंतर जिल्हा प्रवासासाठी स्तर ५ मधील कोणत्याही भागाकडे जात असल्यास किंवा त्यामधून जात असल्यास, प्रवाशाकडे ई-पास असणे बंधनकारक राहील) नियमितपणे परवानगी राहील.

२३. उत्पादन निर्यातीचे बंधन पूर्ण करण्याची आवश्यकता असलेल्या एमएसएमईसह निर्यात करणारे युनिट नियमितपणे सुरू राहतील.

२४. उत्पादनाच्या अनुषंगाने :

१. अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे युनिट (आवश्यक वस्तू आणि कच्चे माल / पॅकेजिंगचे उत्पादन ___ करणारे घटक म्हणून वर्गीकृत केलेल्या वस्तू व आवश्यक असलेल्या पुरवठाच्या साखळीसह)

२. सर्व सतत प्रक्रिया सुरू असणारे उद्योग (ज्या युनिट्ससाठी अशा प्रकारच्या प्रक्रियेची आवश्यकता असते, ज्या अशा प्रकारच्या स्वरूपाच्या असतात ज्यांना त्वरित थांबवता येत नाही आणि पुरेश्या वेळेशिवाय ते पुन्हा सुरू होऊ शकत नाही)

३. राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वस्तूंचे उत्पादन

४. अत्यावश्यक, गंभीर स्वरुपाच्या पायाभूत सेवा सुविधा देणारे डेटा सेंटर / क्लाऊड सेवा देणारे प्रदाता /आयटी सेवा नियमित सुरू राहतील.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा