उद्धव ठाकरे यांच्या आवाहनावर प्रत्यूत्तर
डोंबिवली दि.13 फेब्रुवारी :
हिम्मत असेल तर कुठल्याही निवडणुका लावून दाखवा असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला दिले आहे. त्यावर निवडणूक लागू तर द्या, आम्हीसुद्धा निवडणुकीला तयार असल्याचे प्रत्यूत्तर कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे. Let the elections be held, we are also ready for the elections – MP Dr. Shrikant Shinde
डोंबिवलीतील वै. ह.भ. प. सावळाराम महाराज क्रिडा संकुलात माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टेबल टेनिस कोर्ट आणि विष्णू नगर येथे बांधण्यात आलेल्या पहिल्या वातानुकूलित अभ्यासिकचे लोकार्पण खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना खा.डॉ. शिंदे यांनी हे प्रत्यूत्तर दिले.
निवडणूक घेऊन दाखवा म्हणजे काय ? देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोग आहे की नाही? अभ्यास केला तर असे लक्षात येईल की न्यायालयात ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना हे विषय अद्याप प्रलंबित आहेत. आणि असे असतानाही निवडणूक घ्या , निवडणूक घ्या असे ते सांगत आहेत. अहो, निवडणूक लागू तर द्या, आम्ही पण निवडणूकीला तयारच असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.