![Impact on water supply of Kalyan - Dombivli: Technical fault in power line of Mohili water treatment plant](https://www.localnewsnetwork.in/wp-content/uploads/2024/08/IMG_20240725_110358_206.jpg)
कल्याण दि.13 ऑगस्ट :
कल्याण पश्चिमेला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीमध्ये लिकेज झाल्याने कल्याण पश्चिमेतील काही भागांच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
काल मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातून कल्याण पश्चिम विभागास पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीमध्ये भोईरवाडी, बिर्ला कॉलेज रोड येथे लिकेज झाल्याने हा पाणीपुरवठा बंद करण्यात आलेला आहे.(Leakage in Main Aqueduct : Impact on water supply in “these parts” of Kalyan East-West)
परिणामी शहाडसोबतच कल्याण पश्चिम विभागातील योगीधाम, मिलिंद नगर, सह्याद्री नगर, बिर्ला कॉलेज, भोईरवाडी, चिकणघर, सिंडीकेट, रामबाग, जोशीबाग, कल्याण स्टेशन परिसर आणि कल्याण पूर्व विभागातील अशोकनगर ,शिवाजीनगर या विभागाचा पाणीपुरवठा खंडीत झाला आहे.
केडीएमसी प्रशासनाकडून तातडीने या पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.