
ठाणे दि.२६ जून :
कल्याण डोंबिवलीसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून वरुण राजाने जिल्ह्यात तळ ठोकला असून मध्येच जोरदार तर मध्येच थांबून संततधार पाऊस पडत आहे. परिणामी प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांची गर्मीतून सुटका झाल्याचे चित्र दिसत आहे. पाहू या गेल्या २४ तासांत कल्याण डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमध्ये झालेला पाऊस…