डोंबिवली दि.5 ऑक्टोबर :
डोंबिवली मोठा गाव येथील रेतीबंदर रोडवरील प्रस्तावित रेल्वे उड्डाणपुलाच्या कामात बाधित झालेल्या जमीन मालकांना रोख स्वरूपात मोबदला मिळणार आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पहिल्यांदाच अशाप्रकारे मोबदला मिळत असून या सर्व प्रक्रियेत दिपेश पुंडलिक म्हात्रे यांचा पाठपुरावा महत्त्वपूर्ण ठरला आहे.
या उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे अनेक जमीन मालक बाधित होणार होते आणि त्यांनी योग्य मोबदल्याची मागणी केली होती. अखेर त्यांची ही मागणी पूर्ण होणार असून या बाधित मालकांना रोख स्वरूपात मोबदला देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे डोंबिवली शहराच्या रस्ते वाहतुकीत सुधारणा होणार असून रेल्वे उड्डाणपुलाचे कामही लवकरात लवकर पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या ऐतिहासिक निर्णयामुळे डोंबिवलीच्या विकासात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून त्याबद्दल दीपेश पुंडलिक म्हात्रे यांनी या कामगिरीसाठी प्रशासन, संबंधित अधिकारी आणि सर्व स्थानिकांचे आभार मानले आहेत.