डोंबिवली दि.१३ एप्रिल :
कल्याण डोंबिवली महापालिकेचे कर्मचारी मुरारी जोशी यांचा सुपुत्र निषाद मुरारी जोशी हा एमबीबीएसच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून डॉक्टर झाला आहे.
निषाद जोशी याचे वडील मुरारी जोशी हे केडीएमसीत वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची मोठी मुलगी मोनिका जोशी ही देखील मागील वर्षी डॉक्टर झाली. त्यानंतर बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवून निषादही डॉक्टर झाला. निषादचे शालेय शिक्षण साऊथ इंडीयन विद्यालयात झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण मुलुंडच्या वझे केळकर विद्यालयातून पूर्ण केले.
त्यानंतर त्याने 2018 मध्ये कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज मेडिकल कॉलेजमध्ये त्याने वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला. त्याचे एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण होऊन खऱ्या अर्थाने तो डॉक्टर झाला असून एक वर्ष तिथेच इंटर्नशिप करणार आहे. एम एस मेडीसीन करण्याचा आपला मानस असल्याचे निषाद जोशीने सांगितले.