Home राजकीय घडामोडी कल्याण शहर एनएसयूआय अध्यक्षपदी क्रिशी नायडू यांची नियुक्ती

कल्याण शहर एनएसयूआय अध्यक्षपदी क्रिशी नायडू यांची नियुक्ती


कल्याण दि.22 ऑक्टोबर :

काँग्रेस पक्षाच्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया म्हणजेच एनएसयूआय संघटनेच्या कल्याण शहर अध्यक्षपदी युवा कार्यकर्ते क्रीशी नायडू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कल्याणात झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात काँग्रेसचे कल्याण शहर जिल्हा उपाध्यक्ष राजा पाटकर, ब्लॉक अध्यक्ष विमल ठक्कर, प्रदेश सदस्य मुन्ना तिवारी आदींच्या उपस्थितीत नायडू यांना हे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

काँग्रेसच्या ध्येय धोरणानुसार वाटचाल करण्यासाठी आणि पक्ष संघटना आणखी बळकट करण्यासाठी कार्य करण्याचे निर्देश नायडू यांना पक्ष श्रेष्ठींकडून देण्यात आले आहेत. तर पक्षाने आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी आणि या जबाबदारीला अधिकाधिक न्याय देण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया नवनियुक्त अध्यक्ष क्रिशी नायडू यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी एन एस यू आय चे जिल्हाध्यक्ष रोहीत कदम, कल्याण पश्चिम काँग्रेस अध्यक्ष विमल ठक्कर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजा पाटकर, प्रदेश काँग्रेस सदस्य मुन्ना तिवारी, भगवान साळवे. राजा शेट्टी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा