४ फेब्रुवारी रोजी रंगणार भव्य उदघाटन सोहळा, ४ ते १२ फेब्रुवारी रोजी रंगणार क्रीडा संग्राम…
कल्याण दि .31 जानेवारी :
कल्याण लोकसभा मतदारसंघातील खेळाडूंना विविध खेळांमध्ये आपली प्रतिभा दाखवता यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानें ” खासदार क्रीडासंग्रामाचे ” येत्या ४ ते १२ फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. विविध मान्यवर मंंडळींच्या उपस्थितीत ४ फेब्रुवारीला डोंबिवलीतील वै. ह.भ.प. सावळाराम महाराज क्रिडा संकुलात दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. यामध्ये १५ हून अधिक खेळांचा समावेश असून कुस्ती, मल्लखांब यांसारख्या पारंपरिक खेळांचा देखील समावेश असणार आहे. तर यातील खेळाडूंना पन्नास लाखांहून अधिक रुपयांच्या रोख रकमेची पारितोषिके दिली जाणार आहेत.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी उपक्रमाबाबतची माहिती देण्यासाठी मंगळवारी ठाण्यातील दादाजी कोंडदेव स्टेडियम येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी उपक्रमाच्या लोगोचे आणि गाण्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. सद्यस्थितीत या उपक्रमात वीस हजारहून अधिक नोंदणी झाल्या असून आधी खेळाडूंनी यात सहभाग घ्यावा असे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी आवाहन केले.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध शहरांमध्ये या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी इच्छुक स्पर्धकांना ”khasdarkridasangram@gmail.com ” यावर नोंदणी करता येत आहे. याच बरोबर फॉर्मद्वारे नोंदणी करण्याची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या स्पर्धेचे फॉर्म ठाणे येथील दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या कार्यालयातून सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत स्पर्धकांना मिळत आहेत. या क्रीडा संग्रामात मतदारसंघांतील खेळाडूंनी मोठया संख्यने सहभाग नोंदविण्याचे आवाहन खासदार डॉ.शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मतदारसंघातील नागरिकांसाठी नियमित स्वरूपात विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. याच पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने कल्याण लोकसभा मतदारसंघातील खेळाडूंसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ४ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत मतदारसंघातील विविध शहरांमध्ये या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या १५ खेळांचा आहे समावेश…
क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, मल्लखांब – जिमनॅस्टिक, चेस, रायफल शूटिंग, खो-खो, स्विमिंग, कबड्डी, फुटबॉल कॅरम, ऍथलेटिक्स, बॉक्सिंग, रेसलिंग, टग ऑफ वर या खेळांचा यात समावेश करण्यात आला आहे.
मतदारसंघात याठिकाणी होणार स्पर्धा…
या क्रीडा संग्रामाचा भव्य आणि दिव्य उद्घाटन सोहळा डोंबिवलीच्या ह.भ. प. संतश्रेष्ठ श्री सावळाराम महाराज क्रिडा संकुलात होणार असून इतर स्पर्धा या मुंब्र्यातील मौलाना अब्दुल कलाम आझाद स्टेडियम, पलावा स्टेडियम, स्काय प्लाझा डोम हॉल उल्हासनगर, अंबरनाथ रायफल अँड पिस्टोल शूटिंग रेंज याठीकाणी होणार आहेत. तर दिवा, कळवा, डोंबिवली पुर्व पश्चिम, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, उल्हासनगर आणि अंबरनाथ या ८ ठिकाणी बॉक्स क्रिकेट स्पर्धा होणार आहेत.
उद्घाटन सोहळ्याचे आकर्षण…
आकर्षक लाईट आणि लेझर शो, नयनरम्य फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये सर्व खेळांच्या ट्रॉफिंचे अनावरण, आंतरराष्ट्रीय दर्जाची जिमनॅस्टिकची प्रात्यक्षिके, मल्लखांब प्रात्यक्षिके, खासदार क्रिडा संग्राम स्पर्धेचे थीम साँगचे ॲक्रोबॅट नृत्याच्या माध्यमातून लॉन्चिंग, शिवकालिन खेळ, कलारी पायटू प्रात्यक्षिके या उदघाटन सोहळ्याचे आकर्षण असणार आहे.
रंगणार विशेष स्पर्धा
या क्रीडासंग्रामात प्रशासकीय अधिकारी, राजकीय मंडळी, सेलिब्रिटी, यांचे विशेष सामने देखील भरविले जाणार आहेत.
पारंपरिक खेळांचा समावेश…
खासदार क्रीडा संग्रामात कुस्ती आणि मल्लखांब यांसारख्या पारंपारिक खेळांचा देखील समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मॅट आणि मातीतील कुस्ती अशा दोन्ही पद्धतीचे कुस्ती स्पर्धा भरविल्या जाणार आहेत. ती स्पर्धेची सुरुवात ही महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांच्या कुस्तीने होणार आहे.
अशा प्रकारे रंगणार हा क्रिडासंग्राम..
डोंबिवलीच्या ह.भ. प. संतश्रेष्ठ श्री सावळाराम महाराज क्रिडा संकुलात होणाऱ्या स्पर्धा
1. कबड्डी – ४ ते १२ फेब्रुवारी
2. खो खो– ४,९ ते १२ फेब्रुवारी
3. टेबल टेनिस– ४,९ ते ११ फेब्रुवारी
4. बॅडमिंटन– ९ ते ११ फेब्रुवारी
5. टग ऑफ वॉर– ४ ते ६ फेब्रुवारी
6. स्विमिंग – ४,१० ते ११ फेब्रुवारी
7. बॉक्सिंग – ४ ते ६ फेब्रुवारी
8. कुस्ती – ४ ते ६ फेब्रुवारी
9. मल्लखांब – ४ आणि ५फेब्रुवारी
10. जिमनॅस्टिक– ७ आणि ८फेब्रुवारी
11. बॉक्स क्रिकेट– ४,७ ते १२ फेब्रुवारी
( महत्वाची टीप – लोकसभा क्षेत्रात ८ ठिकाणी साखळी सामने होणार आहेत. (दिवा, कळवा, डोंबिवली पुर्व पश्चिम, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, उल्हासनगर आणि अंबरनाथ) तर ह.भ. प. संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल येथे अंतिम सामने होणार आहे.)
मुंब्य्रातील मौलाना अब्दुल कलाम आझाद स्टेडियमवर होणाऱ्या स्पर्धा..
1. ॲथलेटिक्स – ५ ते ७ फेब्रुवारी
2. जिमनॅस्टिक – १०,११ फेब्रुवारी
पलावा स्टेडियम येथे होणाऱ्या स्पर्धा
1. फुटबॉल – ५ ते १२ फेब्रुवारी
स्काय प्लाझा डोम हॉल उल्हासनगर येथे होणाऱ्या स्पर्धा…
1. कॅरम – ७ ते ८ फेब्रुवारी
2. चेस – ९ ते १० फेब्रुवारी
अंबरनाथ रायफल अँड पिस्टोल शूटिंग रेंज याठीकाणी होणारी स्पर्धा..
1. रायफल शूटिंग – ९ ते ११ फेब्रुवारी