Home ठळक बातम्या निर्भय जर्नलिस्ट फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी केतन बेटावदकर, कार्याध्यक्षपदी मयुरी चव्हाण, सचिवपदी प्रदीप भणगे...

निर्भय जर्नलिस्ट फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी केतन बेटावदकर, कार्याध्यक्षपदी मयुरी चव्हाण, सचिवपदी प्रदीप भणगे तर खजिनदारपदी संघर्ष गांगुर्डे

 

कल्याण डोंबिवली दि.१६ जुलै :
कल्याण डोंबिवलीतील पत्रकारांची प्रमूख संघटना असणाऱ्या निर्भय जर्नलिस्ट फाऊंडेशनची नविन कार्यकारिणी नुकतीच निवडण्यात आली. ज्यामध्ये संघटनेच्या अध्यक्षपदी केतन बेटावदकर, सचिवपदी प्रदीप भणगे तर खजिनदारपदी संघर्ष गांगुर्डे यांची सर्वानुमते निवड झाली. तर मावळते अध्यक्ष किशोर पगारे यांची संस्थापक सल्लागारपदी आणि लोकमत डिजिटलच्या प्रतिनिधी मयुरी चव्हाण काकडे यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

कल्याण डोंबिवलीतील वृत्तपत्र आणि न्यूज चॅनेलच्या प्रतिनिधींनी ३ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या निर्भय जर्नलिस्ट फाऊंडेशन या नोंदणीकृत संस्थेची स्थापना केली आहे. दरम्यान नवनियुक्त कार्यकारिणीचा कार्यकाळ पुढील दोन वर्षांसाठी असणार आहे. कल्याण डोंबिवलीतील पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नविन कार्यकारिणीने यावेळी स्पष्ट केले.

या बैठकीला लोकमतचे वरिष्ठ पत्रकार प्रशांत माने , झी २४ तासचे आतिश भोईर, आजतकचे मिथिलेश गुप्ता, नेशन न्युजचे संघर्ष गांगुर्डे , सकाळच्या शर्मिला वाळुंज, महाराष्ट्र टाइम्सचे फोटो जर्नलिस्ट स्वप्निल शेजवळ यांच्यासह रोशनी खोत आदी सदस्य उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा