कल्याण – डोंबिवली दि. ३० मे :
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढणे तसेच आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार उद्या मंगळवार 31 मे 2022 रोजी होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे कल्याण डोंबिवलीतील राजकीय पक्ष आणि त्यांच्या इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे. (KDMC Election: All eyes on tomorrow’s women’s reservation draw)
उद्या सकाळी सकाळी 11.00 वाजता महापालिकेच्या आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण (पश्चिम) येथे ही आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. तर बुधवार दिनांक 1 जून 2022 रोजी आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात येणार असून आरक्षणाबाबत हरकती आणि सूचना (महापालिका आयुक्त यांच्या नावाने) बुधवार 1 जून ते सोमवार 6 जून 2022 (दुपारी 3.00 वाजेपर्यंत) कल्याण -डोंबिवली महानगरपालिका, महापालिका भवन, तळमजला, शंकरराव चौक, (कल्याण पश्चिम) किंवा संबंधित प्रभाग क्षेत्र कार्यालय येथे सादर करण्याचे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.
दरम्यान उद्याच्या आरक्षण सोडतीवर अनेक इच्छुक उमेदवारांचे भवितव्य ठरणार असल्याने त्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.