कल्याण दि.25 सप्टेंबर :
कल्याण डोंबिवली परिसरात सध्या “स्वच्छता ही सेवा” या अभियान सुरू असून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी कल्याण पश्चिमेच्या साई उद्यान येथे नागरिकांशी संवाद साधला. यावेळी माजी पालिका सदस्य रजनी मिरकुटे, महापालिका उपायुक्त प्रसाद बोरकर, मुख्य उदयान अधिक्षक संजय जाधव, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, इतर अधिकारी वर्ग व अनेक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमातून महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी उपस्थित नागरिकांशी थेट संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या. तर पथनाट्याच्या माध्यमातून कचरा संकलन – कचरा विलगीकरणाबाबत उपस्थितांमध्ये जनजागृतीही करण्यात आली. त्यासोबतच महापालिका क्षेत्रातील उद्यान विकसित करण्याच्या कामाचाही यावेळी शुभारंभ करण्यात आला.
आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी वेळात वेळ काढून सकाळच्या वेळी नागरिकांची थेट – भेट घेतल्यामुळे उपस्थित नागरिकांच्या वतीने माजी पालिका सदस्य रजनी रजकुटे यांनी आयुक्तांचे आभार मानले. स्वच्छता ही सेवा या अभियानात, या पंधरवडयात महापालिकेच्या इतर उद्यानातही महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ नागरिकांसमवेत स्वच्छता संवाद साधणार आहेत.