(फाईल फोटो)
कल्याण दि.15 एप्रिल :
कल्याण पश्चिमेच्या रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कचऱ्यात वापरलेले पीपीई किट, मास्क, हँडग्लोव्हज आदी मेडीकल वेस्ट टाकल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाने संबंधित डॉक्टरवर कारवाई केली आहे. संबंधित रुग्णालयाचे डॉक्टर उपाध्ये यांना केडीएमसीने 10 हजारांचा दंड वसूल केला आहे.
स्टेशन रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कचऱ्यात मेडीकल वेस्ट फेकून देण्यात आल्याची बातमी एलएनएनने मंगळवारी 13 एप्रिल रोजी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत केडीएमसी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदार कोकरे आणि प्रभारी आरोग्य निरिक्षक जगन्नाथ वड्डे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच या मेडीकल वेस्टमध्ये संबंधित डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शनही आढळले होते. याप्रकरणी केडीएमसी प्रशासनाने डेंटल क्लिनिकचे डॉ. उपाध्ये यांना नी मेडिकल वेस्ट सार्वजनिक ठिकाणी टाकल्यामुळे त्यांच्याकडून रुपये 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.