कल्याण दि.9 नोव्हेंबर :
नुकत्याच झालेल्या ठाणे जिल्हा फुटबॉल स्पर्धेत कल्याण सिटी फुटबॉल क्लबने उपविजेतेपद पटकावले. या कामगिरीमुळे 2024-25 मध्ये होणाऱ्या सुपर डिव्हिजन स्पर्धेसाठी पात्र ठरल्याने आनंदाचे वातावरण आहे. हे ध्येय साध्य करण्यात कल्याणच्या एलिट स्पोर्टिंग अकादमीने घेतलेला पुढाकाराने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
नवी मुंबईतील खारघर येथे ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान ही जिल्हास्तरीय स्पर्धा पार पडली. ज्यामध्ये जिल्ह्याच्या विविध भागांतून 10 टीम आणि तब्बल 250 खेळाडू सहभागी झाले होते. मात्र यामध्ये कल्याणातील एलीट स्पोर्टिंग अकादमीचा भाग असलेल्या कल्याण सिटी फुटबॉल क्लबच्या खेळाडूंनी आपला विशेष ठसा उमटवला आणि थेट उप विजेतेपदापर्यंत मजल मारली. या टीमची स्थापना झाल्यापासून म्हणजेच 2005 पासून आतापर्यंत कल्याणच्या संघाची ही सर्वोत्तम कामगिरी असल्याची प्रतिक्रिया एलीट स्पोर्टिंग अकादमीतर्फे देण्यात आली.
काय आहे एलीट स्पोर्टिंग अकादमी…?
2016 पासून एलिट स्पोर्टिंग अकादमीने कल्याण आणि आसपासच्या परिसरातील अनेक लहान मुलांना फुटबॉलकडे आकर्षित केले. ज्यामुळेच कल्याण शहरातील वरिष्ठ खेळाडूंसाठी कल्याण सिटी फुटबॉल क्लबची स्थापना करण्यात आली. तर सरावासाठी अगदी मर्यादित मैदानी सुविधा असतानाही आम्ही कठोर परिश्रम आणि समर्पणाने हे यश मिळवू शकलो. आणि आजही आम्ही पूर्ण आकाराच्या मैदानासाठी प्रयत्न करत असल्याचे या अकादमीतर्फे सांगण्यात आले.
वर्षानुवर्षे खेळाडूंना सातत्याने प्रशिक्षण दिल्याने आम्ही इथपर्यंत पोहचू शकलो आहोत. आमच्याकडे 1980 आणि 1990 च्या दशकात 2000 च्या सुरुवातीपर्यंत फुटबॉल संस्कृती होती. ज्यामुळे 2005 मध्ये ठाणे जिल्हा फुटबॉल असोसिएशन चॅम्पियन बनण्यास मदत झाली. एलिट अकादमीचे संस्थापक लेस्टर पीटर्स हे देखील संघातील एक प्रमूख खेळाडू होते. आणि त्यानंतर कल्याणात फुटबॉलची ही सुंदर संस्कृती सुरू झाली. मात्र अनेक अडचणी आणि विविध कारणांमुळे उदा. सरावासाठी मैदान उपलब्ध नसल्याने मोठी गैरसोय होत असल्याचे अकादमीतर्फे सांगण्यात आले.
अशी आहे एलिट स्पोर्टिंग अकादमीची संपूर्ण टीम –
संस्थापक लेस्टर पीटर्स,
कल्याण फुटबॉल क्लबचे मुख्य प्रशिक्षक- स्लेड स्टॅनले,
क्रीडा समन्वयक- शीतल रसलम,
प्रशिक्षक – मनीष मंडलोई,
प्रशिक्षक – वैभव बिरारी