Home ठळक बातम्या कल्याण पश्चिम विधानसभा ; शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली भाजपचे माजी मंत्री कपिल पाटील...

कल्याण पश्चिम विधानसभा ; शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली भाजपचे माजी मंत्री कपिल पाटील यांची भेट

महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांचीही उपस्थिती

कल्याण दि.11 नोव्हेंबर :
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून कल्याण पश्चिमेतील राजकीय वातावरणही चांगलेच रंगू लागले आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी भाजपचे माजी मंत्री कपिल पाटील यांची काल रात्री भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्यासह जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, शहरप्रमुख रवी पाटील, सुनिल वायले आणि खा.डॉ. श्रीकांत शिंदे अभिजीत दरेकरदेखील उपस्थित होते.
हेदेखील यावेळी उपस्थित होते.(Kalyan West Assembly; Shiv Sena officials met former BJP minister Kapil Patil)

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला समर्थन आणि सहकार्य करण्याच्या उद्देशाने ही भेट झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
मात्र आज सायंकाळी विश्वनाथ भोईर यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयामध्ये एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये यासंदर्भातील अधिकृत माहिती दिली जाणार आहे.

दरम्यान या भेटीमध्ये भाजपचे माजी मंत्री कपिल पाटील यांनी कल्याण पश्चिमेतील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांना पाठींबा देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे समजत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा