Home ठळक बातम्या पहलगाममधील भ्याड हल्ल्याचा कल्याण तालुका अधिवक्ता परिषदेकडूनही तीव्र निषेध

पहलगाममधील भ्याड हल्ल्याचा कल्याण तालुका अधिवक्ता परिषदेकडूनही तीव्र निषेध

कल्याण दि. 25 एप्रिल :
काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर समाजाच्या सर्वच स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे. कल्याण तालुका अधिवक्ता परिषदेतर्फेही झालेल्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करून त्याविरोधात निदर्शने करण्यात आली. अधिवक्ता परिषदेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी कल्याण पश्चिमेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत आपला विरोध नोंदवला. (Kalyan Taluka Advocates Council also strongly condemns the cowardly attack in Pahalgam)

या भ्याड हल्ल्याचा देशातील केंद्र सरकारकडून योग्य तो बदला नक्कीच घेतला जाईल असा विश्वास व्यक्त करण्यासह देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्याची आग्रही मागणीही यावेळी अधिवक्ता परिषदेच्या वतीने करण्यात आली. तसेच दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या घटकांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची आणि पीडित कुटुंबीयांना तातडीने मदत आणि न्याय देण्याची मागणीचे निवेदनही कल्याण तहसीलदारांना देण्यात आले.

यावेळी अधिवक्ता परिषद कल्याण तालुका संघटनेचे तालुका अध्यक्ष ॲड. प्रल्हाद भिलारे, तालुका पालक ॲड. सतीश अत्रे, जिल्हा सहसचिव ॲड. अर्चना सबनीस, वरिष्ठ अधिवक्ता के. टी. जैन, कोकण प्रांत सचिव ॲड. रेखा कांबळे, महामंत्री ॲड. पुजा भालेराव, सचिव ॲड. नरेंद्र बोन्द्रे, उपाध्यक्ष ॲड. नागेश कांबळे, व्यवस्थापन प्रमुख ॲड राजु राम, ॲड हेमंत चव्हाण, ॲड. आशीष सोनी, ॲड. तृप्ती बोंद्रे, ॲड शिल्पा राम, ॲड आनंद पवार, ॲड. सुप्रिया नाईक, ॲड. रोनक कारीरा यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा